'बुरे दिन जाने वाले है, राहुल गांधी आने वाले है'

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

"राष्ट्र आणि काँग्रेसच्या हिताचे ज्या काही बाबी असतील त्या आम्ही सर्व काही करणार आहोत. आम्ही राहुल गांधी यांचे शिपाई आहोत. धर्मामध्ये सर्वांत मोठा धर्म आहे तो म्हणजे राष्ट्रधर्म. 'बुरे दिन जाने वाले है, राहुल गांधी आने वाले है'. लाल किल्ल्यावर राहुल गांधी झेंडा फडकवतील. त्यामुळे त्याला आता कोणीही थांबवू शकत नाही''.

-  नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेस नेते

नवी दिल्ली : ''धर्मामध्ये सर्वांत मोठा धर्म आहे तो म्हणजे राष्ट्रधर्म. राष्ट्र आणि काँग्रेसच्या हिताचे असेल ते सर्व काही आम्ही करणार आहोत. 'बुरे दिन जाने वाले है, राहुल गांधी आनेवाले है', असे काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले. तसेच आम्ही राहुल गांधींचे शिपाई आहोत, असेही ते म्हणाले.

हैदराबाद येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. सिद्धू म्हणाले, "राष्ट्र आणि काँग्रेसच्या हिताचे ज्या काही बाबी असतील त्या आम्ही सर्व काही करणार आहोत. आम्ही राहुल गांधी यांचे शिपाई आहोत. धर्मामध्ये सर्वांत मोठा धर्म आहे तो म्हणजे राष्ट्रधर्म. 'बुरे दिन जाने वाले है, राहुल गांधी आने वाले है'. लाल किल्ल्यावर राहुल गांधी झेंडा फडकवतील. त्यामुळे त्याला आता कोणीही थांबवू शकत नाही''.

दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणूक येत्या 7 डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस आणि भाजपसह इतर पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. काँग्रेस नेते सिद्धू यांनी प्रचारसभेपूर्वी हे वक्तव्य केले आहे. 
 

 

Web Title: Navjot Singh Sidhu Praises Congress President Rahul Gandhi