सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे, म्हणून...- कॅ. अमरिंदर सिंग

सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे, म्हणून...- कॅ. अमरिंदर सिंग

नवी दिल्ली: नवज्योत सिंग सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं असून त्यासाठी ते प्रयत्न करत असल्यामुळेच, ते चुकीची विधानं करीत असल्याचा आरोप पंजाबजे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केला आहे. मात्र, आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले, सिद्धू महत्वाकांक्षी आहेत हे ठीक आहे. लोक महत्वाकांक्षी असतात, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्यासोबत माझे कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत. मात्र, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी असल्याने त्यांना माझ्या जागी मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळेच ते चुकीची विधानं करीत आहेत. यासाठी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापले असून अमरिंदर सिंग आणि आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामधील शीतयुद्ध पुन्हा एकदा या आरोप-प्रत्यारोपांमुळे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com