आदरणीय मॅडम म्हणत सिद्धूंनी टाकली विकेट; सोनिया गांधींकडे दिला राजीनामा

Navjot Sidhu
Navjot Sidhu
Summary

नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विटरवर सोनिया गांधींकडे पाठवलेला राजीनामा शेअर केला आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सिद्धूंनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. पाच राज्यांच्या विधासनभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. यानतंर सिद्धूंनी त्यांच्या पदाचा राजीनामा सोनिया गांधींकडे दिला आहे.

नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विटरवर सोनिया गांधींकडे पाठवलेला राजीनामा शेअर केला आहे. यामध्ये म्हटलं की, काँग्रेस अध्यक्षांच्या इच्छेनुसार मी माझा राजीनामा सोपवला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आपकडून पराभव पत्करावा लागला. पंजाब विधानसभेत ११७ पैकी १८ जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. निवडणुकी आधी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांच्याकडे पंजाबचे प्रदेशाध्यक्षपद तर चन्नींना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. मात्र सिद्धूंना त्यांची जबाबदारी योग्य पार पाडता न आल्यानं पक्षश्रेष्ठी नाराज झाले होते.

Navjot Sidhu
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देणार?

पंजाबसह पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसने मोठे बदल करण्याची तयारी सुरु केलीय. सर्वात आधी पराभव पत्करावा लागलेल्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडून राजीनामे घेण्यात आले आहेत. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर म्हटलं होतं की, राज्यातील काँग्रेसमध्ये बदलासाठी राजीनामे घेण्यात येत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com