नौदलाकडून स्मार्ट फोनसह सोशल मीडियावर बंदी

पीटीआय
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

नौदलाचे तळ, गोदी आणि युद्धनौकांवर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबरोबरच स्मार्ट फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नवी दिल्ली - नौदलाचे तळ, गोदी आणि युद्धनौकांवर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबरोबरच स्मार्ट फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नौदलाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, येथून पुढे नौदलाचे तळ, गोदी आणि युद्धनौकांवर सर्व प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि स्मार्ट फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती शत्रूच्या गुप्तचर संस्थांना पुरविल्याप्रकरणी नौदलाच्या सात कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील नियम अधिक कडक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आग लागल्याने रस्ता बंद

फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील माहिती फोडणारे रॅकेट नौदलाकडून उघड करण्यात आले होते. याप्रकरणी नौदलाच्या सात खलाशांना केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या साह्याने आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. नौदलाची अतिशय संवेदनशील माहिती हे सर्व जण पाकिस्तानला पुरवत होते, असा आरोप त्यांच्याविरोधात ठेवण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती 

नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या संदर्भातील संवेदनशील माहिती फेसबुकच्या माध्यमातून बाहेर पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navy ban social media with smart phones