गर्भवती महिलेसाठी नौदलाचे जवान ठरले 'देवदूत' 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सजिता झाबे असे त्या महिलेचे नाव आहे. सजिता या केरळमधील अलूवा येथे राहत आहेत. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे त्यांच्या प्रसूतीचा प्रश्न उभा राहिला होता. मात्र, नौदलाचे जवान त्यांच्या मदतीसाठी धावून आले. या जवानांनी सजिता यांना एका दोरीच्या साहाय्याने घरातून बाहेर काढले.

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे वाहतुकसेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. केरळमधील एका गर्भवती महिलेला वैद्यकीय मदतीची गरज असताना भारतीय नौदलाचे जवान तिच्या मदतीसाठी आले. या जवानांनी त्या महिलेला घरातून बाहेर काढत एका हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रुग्णालयात नेले. तिथे त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.  

सजिता झाबे असे त्या महिलेचे नाव आहे. सजिता या केरळमधील अलूवा येथे राहत आहेत. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे त्यांच्या प्रसूतीचा प्रश्न उभा राहिला होता. मात्र, नौदलाचे जवान त्यांच्या मदतीसाठी धावून आले. या जवानांनी सजिता यांना एका दोरीच्या साहाय्याने घरातून बाहेर काढले. त्यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. या उपचारानंतर सजिता यांनी मुलाला जन्म दिला. 

दरम्यान, नौदलाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र एकच चर्चा आहे.

Web Title: Navy Force Rescued pregnant woman