सपा नेत्याची नक्षलवाद्यांनी केली हत्या

Naxalite
Naxalite

बिजापूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) एका नेत्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. संतोष पुनेम असे या नेत्याचे नाव आहे. पुनेम हे व्यवसायाने एक कंत्राटदार होते. काल (मंगळवार) सायंकाळी मारिमल्ला गावातील रस्ते बांधकामासंबंधित कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी पुनेम तेथे गेले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पुनेम यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी दिली.

आज (बुधवार) सकाळी मारिमल्ला टेकड्यांवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पुनेम यांचा मृतदेह आढळल्यावर स्थानिक लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, ते ठिकाण घनदाट जंगलाने वेढलेले आहे. 

हे ठिकाण पोलिस ठाण्यापासून 16 किमी अंतरावर असून सुरक्षा पथकाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. पुनेम यांनी गेल्या वर्षी बिजापूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com