जेव्हा सुप्रिया सुळे दिल्लीच्या रस्त्यांवर सायकलिंग करतात...

वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नेते दिल्लीत असताना खासदार सुप्रिया सुळे चर्चेत आल्या आहेत. या चर्चेचं कारण आहे त्यांची सायकल सवारी. दिल्लीतील रस्त्यांवरून त्यांनी केलेल्या सायकल सवारीमुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नेते दिल्लीत असताना खासदार सुप्रिया सुळे चर्चेत आल्या आहेत. या चर्चेचं कारण आहे त्यांची सायकल सवारी. दिल्लीतील रस्त्यांवरून त्यांनी केलेल्या सायकल सवारीमुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशनाबरोबरच दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचीही जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यामधील सत्ता स्थापनेवर दिल्लीत खलबतं झाली आहेत. त्यामुळेच अनेक नेत्यांच्या वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. असं असतानाही सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवली.

खूशखबर ! इथं आहेत 1 लाख नोकरीच्या संधी

 

सुप्रिया यांचा सायकल चालवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे स्वेटर आणि कानामध्ये हेडफोन्स घालून सुप्रिया सुळे सायकल चालवताना दिसत आहेत. सुळे यांनी ट्विटवरुनही लोकसभा सचिवालयातील सेवक असणाऱ्या चावीलाल या व्यक्तीबरोबरचा सायकलवरील फोटो पोस्ट केला होता. लोकसभेत आम्हाला योग्य पद्धतीने काम करता यावे म्हणून अनेक लोक कष्ट घेतात, असं सुप्रिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Supriya Sule is cycling on the streets of Delhi