'एनएसयूआय'च्या अध्यक्षाचा राजीनामा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून "एनएसयूआय' या कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष फिरोझ खान याला पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, आरोप सिद्ध झाला नसला तरी नैतिकतेच्या मुद्यावरून हा राजीनामा देण्यात आल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. 

जम्मू-काश्‍मीरचा निवासी असलेल्या फिरोझ खानची काही महिन्यांपूर्वीच "एनएसयूआय'च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, "एनएसयूआय'च्या छत्तीसगडमधील महिला पदाधिकाऱ्याने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यामुळे जोरदार खळबळ उडाली होती. सत्ताधारी भाजपने या मुद्‌द्‌याचे भांडवल करताना कॉंग्रेसवर प्रहार केले होते. अखेर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी कॉंग्रेसने तीन नेत्यांची समिती नेमली होती. फिरोझ खान याने या आरोपांचा इन्कार केला असला तरी पक्षहिताचा विचार करून राजीनामा देत असल्याची घोषणा आज केली. चौकशी समितीचा औपचारिक अहवाल येण्याच्या आधीच त्याने राजीनामा दिला.

संबंधित महिलेने जूनमध्ये फिरोझ खानवर आरोप केल्यानंतर गेल्याच महिन्यात त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रारही केली होती. मात्र, देशभरात सुरू असलेल्या #MeToo हिमेनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. दरम्यान, पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी हा राजीनामा स्वीकारला असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: NCUI president resigns