मोदी सरकारकडून जाहिरातींवर तब्बल 5909 कोटींचा खर्च!

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- मोदी सरकारचा जाहिरातींचा खर्च आला समोर.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए-1 सरकारच्या कार्यकाळात विविध प्रकारच्या जाहिरातींवर तब्बल 5 हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी मागील आर्थिक वर्षात तब्बल बाराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. याबाबतची आकडेवारी 'ब्यूरो ऑफ आउटरीच अ‍ॅण्ड कम्युनिकेशन'ने (बीओसी) दिली आहे. 

मोदी सरकारने जाहिरातींवर किती खर्च केला याबाबतची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 22 मे रोजी केंद्र सरकारकडे मागितली होती. त्यानंतर ही माहिती बीओसीने दिली आहे. यामध्ये मोदी सरकारकडून मागील पाच वर्षांत जाहिरातींवर 5909 कोटी 39 लाख 51 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या मागील पाच वर्षांमध्ये एनडीए सरकारने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि आउटडोर मीडियावर एकूण चार प्रकारांमध्ये जाहिराती केल्या गेल्या. त्यामध्ये प्लॅन, नॉन प्लॅन यांसारख्या जाहिरातींवर हा सर्व खर्च केला गेला.

तसेच तब्बल बाराशे कोटी रुपये मागील आर्थिक वर्षात खर्च करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In NDA 1 Modi government the expenditure on advertising estimated of Rs 5909 crores