फरारी नीरव मोदी ब्रिटनमध्येच 

पीटीआय
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

लंडन/नवी दिल्ली (पीटीआय) : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी ब्रिटनमध्येच असल्याच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दाव्याला तेथील सरकारने दुजोरा दिला. दरम्यान, नीरव मोदी ब्रिटनमध्येच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने गृह मंत्रालयाला प्रत्यार्पणासाठी विनंती पाठविली आहे. नीरव मोदीला परत पाठविण्याची विनंती आता परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून ब्रिटनला पाठविली जाईल. 

अधिकाऱ्यांनी सांगितले, की मोदीला त्याच्याविरुद्ध इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर ताब्यात घेण्याची विनंतीही सीबीआयने ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना केली आहे. यावर्षी जूनमध्ये सीबीआयच्या विनंतीनुसार रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. एखाद्या फरार आरोपीविरुद्ध जारी केल्या जाणाऱ्या रेड कॉर्नर नोटीसमध्ये इंटरपोलने आपल्या 192 सदस्य देशांना त्यांच्या देशात असा आरोपी दिसल्यास त्याला अटक करावी किंवा ताब्यात घ्यावे, असे म्हटलेले असते. त्यानंतर प्रत्यार्पण किंवा इस्तांतराची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नीरव मोदीने त्याची पत्नी अमी मोदी, जी अमेरिकी नागरिक आहे, भाऊ निशाल मोदी, जो बेल्जियमचा नागरिक आहे आणि मामा मेहुल चोक्‍सी यांच्याबरोबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देश सोडून पलायन केले होते. 

Web Title: Neerav Modi is in Britain