उमेदवारांना लवकरच मिळणार 'NEET 2018' प्रवेशपत्र ; असे करा डाऊनलोड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, अशा उमेदवारांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर cbseneet.nic.in. मिळणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी (नीट) लागणारे प्रवेशपत्र (अॅडमिटकार्ड) संबंधित उमेदवारांना लवकरच देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र cbseneet.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

NEET

सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, अशा उमेदवारांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर cbseneet.nic.in. मिळणार आहे. 'नीट' प्रवेश परीक्षा 2018चे प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेली माहिती त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जात, पोट-जात, छायाचित्र, सही, जन्मतारिख आणि प्रश्नपत्रिकेची भाषा आणि परीक्षा केंद्राचा पत्ता या सर्व बाबी तपासण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

तसेच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना प्रवेशपत्र आणि दोन छायाचित्रसोबत घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र - 

- 'नीट'चे अधिकृत संकेतस्थळ cbseneet.nic.in ला भेट द्या.

- प्रवेशपत्रासंबंधित लिंकवर क्लिक करा.

- लॉगिन पेजवर महत्वाची माहिती भरा आणि त्यानंतर सबमिट करा.

- त्यानंतर प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

- प्रवेशपत्र दिसल्यानंतर ते तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल. 

Web Title: NEET 2018 Admit cards expected anytime soon say CBSE Download Here