नीटच्या कटऑफमध्ये 15 टक्‍क्‍यांनी कपात

पीटीआय
शनिवार, 28 एप्रिल 2018

नीट (पीजी) आणि नीट (एसएस) या परीक्षांसाठी आवश्‍यक टक्केवारीत (कटऑफ परसेंटाईल) 15 टक्‍क्‍यांनी कपात करण्याचा निर्णय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 18 हजार विद्यार्थ्यांना होईल, असा अंदाज आहे. 

नवी दिल्ली : नीट (पीजी) आणि नीट (एसएस) या परीक्षांसाठी आवश्‍यक टक्केवारीत (कटऑफ परसेंटाईल) 15 टक्‍क्‍यांनी कपात करण्याचा निर्णय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 18 हजार विद्यार्थ्यांना होईल, असा अंदाज आहे. 

या निर्णयामुळे पदव्युत्तर पदवीच्या जागा भरण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होऊन रिक्त राहणाऱ्या जागांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, पदव्युत्तर पदवीच्या जागा भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्र सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले गेले असून, सरकारने वैद्यकीय क्षेत्राला दिलेले प्राधान्य यामुळे अधोरेखित होते.

दर्जेदार आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही नड्डा यांनी नमूद केले. 

Web Title: NEET Cutoff 15 percentage reduces