'नेहरूंच्या चुकीमुळे काश्‍मीरची ही अवस्था' 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

विरोधकांचा आक्षेप 
जम्मू- काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास सर्वच विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. लोकसभेत या संदर्भात मांडण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करताना कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाने एस. आर. बोमानी खटल्यामध्ये दिलेल्या निकालाचे सरकारने उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. कारण कोणत्या पक्षाकडे बहुमत आहे किंवा नाही हे केवळ बहुमताच्या चाचणीतूनच स्पष्ट होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटल्याचा दाखला थरूर यांनी दिला. थरूर यांच्याप्रमाणेच तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अण्णा द्रमुकच्या सदस्यांनीदेखील हेच मत मांडले. 

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरमधील अराजकतेला केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी कॉंग्रेसला जबाबदार ठरविले आहे. मागील कॉंग्रेस सरकारांनी केलेल्या घोडचुकांमुळे राज्यात ही स्थिती निर्माण झाली असून, याचा सिलसिला नेहरू यांच्या चुकांपासून सुरू होतो, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. जम्मू- काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत मांडण्यात आलेल्या कायदेशीर ठरावावर आयोजित चर्चेत सहभागी होताना सिंह यांनी पुन्हा इतिहासाचीच उजळणी केली. 

जम्मू- काश्‍मीरमध्ये सध्या जे काही सुरू आहे, त्याला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार असून, त्यानंतर आलेल्या कॉंग्रेस सरकारांनी देखील त्यांच्याच चुकांची पुनरावृत्ती केली. या चुकांचेच फळ म्हणजे राज्यातील विद्यमान स्थिती आहे, असा आरोपही त्यांनी केला. लोकांच्या इच्छेखातरच आम्ही राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले होते, त्यांच्या इच्छेनुसार आम्ही माघार घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. 

विरोधकांचा आक्षेप 
जम्मू- काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास सर्वच विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. लोकसभेत या संदर्भात मांडण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करताना कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाने एस. आर. बोमानी खटल्यामध्ये दिलेल्या निकालाचे सरकारने उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. कारण कोणत्या पक्षाकडे बहुमत आहे किंवा नाही हे केवळ बहुमताच्या चाचणीतूनच स्पष्ट होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटल्याचा दाखला थरूर यांनी दिला. थरूर यांच्याप्रमाणेच तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अण्णा द्रमुकच्या सदस्यांनीदेखील हेच मत मांडले. 

महिला आरक्षण विधेयक मांडा 
संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक केंद्र सरकारने तातडीने सादर करावे, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य पी.के.एस. टीचर यांनी आज शून्य प्रहरामध्ये लोकसभेत केली. त्यांच्या या मागणीला अन्य पक्षांच्या सदस्यांनी देखील पाठिंबा दिला. 

Web Title: Nehruvian blunder responsible for J&K crisis says Jitendra Singh