भारतीय भूमीवर नेपाळकडून अतिक्रमण, सैन्याने पाठविला गृहमंत्रालयाला अहवाल

भारतीय भूमीवर नेपाळकडून अतिक्रमण
India Nepal Relation News
India Nepal Relation Newsesakal

चंपावत : उत्तराखंडच्या चंपावतमध्ये भारत (India) -नेपाळ सीमेवर नेपाळने भारताच्या पाच हेक्टर भूमीवर अतिक्रमण केले आहे. सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) अधिकाऱ्याने ही माहिती देताना सांगितले, दलाने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबत अहवाल पाठविला आहे. दुसरीकडे वन विभागानेही नेपाळच्या (Nepal) अतिक्रमणावर सरकारला अहवाल पाठविला आहे. वन विभागानुसार गेल्या तीन दशकांमध्ये या अतिक्रमण केलेल्या जमिनीवर पक्क्या घरांसह अस्थायी झोपड्या आणि दुकानेही बनवण्यात आली आहे. (Nepal Encroached On 5 Hectares Land Of India)

India Nepal Relation News
भाजपचा उद्धव ठाकरेंवर इतका राग का?, शिवसेना संपवण्याचे 'कट' कारस्थान

सीमा सशस्त्र दलाचे सहायक कमांडंट अभिनव तोमर यांनी भारताच्या भूमीवरील नेपाळने केलेल्या अतिक्रमणावर म्हणाले, की हे आताच केले गेलेले नाही. नेपाळकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबतचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. आता सर्व्हे ऑफ इंडिया आणि सर्व्हे ऑफ नेपाळच्या चमू सर्व्हे करुन वस्तुस्थिती स्पष्ट करणार आहे.

३० वर्षांपासून होत आहे अतिक्रमण

वन विभागानुसार टणकपूर जिल्ह्याच्या शारदा रेंजला लागून असलेल्या भारत-नेपाळच्या शारदा बेटासह ब्रह्मदेवमध्ये अनेक ठिकाणांवर नेपाळकडून गेल्या ३० वर्षांमध्ये अतिक्रमण केला जात आहे.

India Nepal Relation News
Maharashtra | बंडखोर शिवसेना आमदारांची हाॅटेलवारी जोरात, जनता मात्र वाऱ्यावर

५ हेक्टर भूमीवर अतिक्रमण

टणकपूरच्या रेंजर महेश बिष्ट म्हणाले, की सीमेला लागून असलेल्या भारतीय वन क्षेत्रात जवळपास पाच हेक्टर भूमीवर नेपाळकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण केलेल्या जागेवर नेपाळकडून पक्के घरांसह अस्थायी झोपड्या आणि दुकाने बांधण्यात आले आहेत, असे बिष्ट यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com