भाजपच्या WhatsApp ग्रुपवर पॉर्न व्हिडिओ!

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

- वरिष्ठांकडे तक्रार

अहमदाबाद : सध्या WhatsApp चा वापर मोठ्या संख्येने केला जात आहे. त्यातच विविध पक्षातील राजकीय नेतेमंडळी, कार्यकर्तेही वापर करत आहेत. मात्र, आता भाजपच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या WhatsApp ग्रुपवर 70 हून अधिक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केले. हा प्रकार समोर आल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

गौतम पटेल असे संबंधित नेत्याचे नाव आहे. पटेल हे भाजपच्या नरोदा युनिटचे सचिव आहेत. 'नरोदा 12 (मोदी फिर से)' हा भाजप कार्यकर्त्यांचा WhatsApp आहे. या ग्रुपवर गौतम पटेल यांनी पॉर्न व्हिडिओ शेअर केले. हे व्हिडिओ शेअर झाल्याचे पाहिल्यानंतर ग्रुपमधील काही महिला मेंबर्ससह अनेक पदाधिकारी या ग्रुपमधून बाहेर पडले. 

माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

दरम्यान, हा प्रकार घडल्याचे समजल्यानंतर गौतम पटेल यांनी सांगितले, की माझा फोन हरवला असून, काही अज्ञात व्यक्तींकडून माझी प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्न केला जात आहे.

वरिष्ठांकडे तक्रार

पटेल यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकाराची तक्रार अहमदाबाद जिल्ह्याचे प्रमुख आय. के. जाडेजा आणि शहराध्यक्ष जगदीश पांचाळ यांच्याकडे केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neta posts porn videos in BJP WhatsApp group