नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच - आशिष रे

पीटीआय
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कोलकता - नवीन कागदपत्रांनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा दावा त्यांचे नातू व संशोधक आशिष रे यांनी आज केला. आपल्याकडे याबाबत ठोस पुरावे असून, त्यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तैपेई (तैवान) येथे 18 ऑगस्ट 1945 मध्ये झालेल्या अपघातासंबंधी जपानचे दोन व रशियाचा एक असे तीन स्वतंत्र अहवाल तयार करण्यात आले असून, या अहवालातील माहितीनुसार, विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. त्यांना त्या वेळी सोव्हियत युनियनमध्ये जाण्याची संधी मिळालीच नाही. त्यांना कैद करण्यात आले होते. असे रे यांनी सांगितले.

रशिया हा कम्युनिस्ट देश असल्याने नेताजींनी तेथे जाण्याची योजना आखली होती. भारतातून ब्रिटिशांना घालविण्यासाठी रशियाकडून मदत मिळेल, असा विश्वास त्यांना होता. तर जपानने शरणागती पत्करल्याने तेथे आपल्याला धोका उद्‌भवू शकतो. याचीही त्यांना कल्पना होती. असेही रे यांनी निदर्शनास आणून दिले.

सत्य समोर येणे महत्त्वाचे
नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला. हे सत्य व त्याबाबतचे पुरावे आपण किती दिवस नाकारणार आहोत. शेवटी यामागील सत्य बाहेर येणे महत्त्वाचे आहे. शक्‍य असल्यास रेणकोजी मंदिरातील अस्थींची डीएनए चाचणी घेतली, तर कदाचीत नेताजींच्या अस्थी भारतात आणणे शक्‍य असल्याचे रे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Netaji died in the plane accident