मुलायम अखिलेशवर जळतात: रामगोपाल यादव

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - समाजवादी पक्षामधील अंतर्गत संघर्ष शमण्याची अद्यापी कोणतीही चिन्हे नसून याआधीच भडकलेल्या वादात पक्षामधून नुकतेच बहिष्कृत केलेले नेते रामगोपाल यादव यांनी केलेल्या नव्या विधानामुळे ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व त्यांचे पुत्र असलेल्या अखिलेश यादव यांच्या लोकप्रियतेविषयी असूया असल्याचे स्फोटक विधान रामगोपाल यांनी केले.

अखिलेश यांच्याशिवाय समाजवादी पक्ष नसल्याची भावना व्यक्त करत रामगोपाल यांनी अखिलेश यांना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करणे, हेच आपले एकमेव उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे.

"आपल्या पुत्राने आपल्यापेक्षाही चांगली कामगिरी करुन दाखवावी, अशी प्रत्येकच पित्याची इच्छा असते. मात्र येथे सर्व प्रकार विरोधीच घडत आहे. असे होणे बरोबर नाही. ही घटना दु:खद आहे. परंतु "जादुगारां'नी नेताजींचे मन कलुषित केले आहे,'' असे रामगोपाल म्हणाले. जादुगार असा शब्दप्रयोग केलेल्या रामगोपाल यांचा इशारा मुलायम यांनी पाठराखण केलेल्या अमर सिंह यांच्याकडेच असल्याचे मानले जात आहे. पक्षामधील रुंदावलेल्या संघर्षाच्या दरीस अमर सिंहच कारणीभूत असल्याचा आरोप अखिलेश व रामगोपाल यांनी केला आहे. तेव्हा अमर सिंह हे मुलायम यांच्यासाठी एवढे विशेष का आहेत, अशी विचारणाही रामगोपाल यांनी यावेळी केली.

""अमर सिंह यांनी तुरुंगामध्ये जाण्यापासून वाचविले, असे विधान करण्यापूर्वी मुलायम यांनी 100 वेळा विचार करावयास हवा होता. या विधानाचा अर्थ म्हणजे एकतर अमर सिंह यांनी न्यायालयास वा केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) आपल्याकडे वळवून घेतले, असा होतो. परंतु कधीकधी अशी परिस्थिती अर्थकारणामध्येही उद्‌भवते. खऱ्या नाण्यास बाजुला सारुन बाजारामध्ये खोटेच नाणे वापरले जाते. अमर सिंह यांना एवढे महत्त्व का, नेताजी व शिवपालजीच सांगू शकतील,'' असा उपहासात्मक टोला रामगोपाल यांनी यावेळी लगावला. रामगोपाल यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा गेल्या रविवारी करण्यात आली होती.

Web Title: netaji jealous of akhilesh's popularity, says Ram Gopal