
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद! सारख्या घोषणांनी स्वातंत्र्याच्या लढाईला नवी ऊर्जा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील (तत्कालीन ओरिसा) कटकमध्ये झाला होता.
नवी दिल्ली - तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद! सारख्या घोषणांनी स्वातंत्र्याच्या लढाईला नवी ऊर्जा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील (तत्कालीन ओरिसा) कटकमध्ये झाला होता. सुभाषचंद्र बोस हे एक सुखवस्तू कुटुंबातील होते. नेताजी हे लहाणपणापासूनच अभ्यासात हुशार होते. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांना योगदान देण्याची इच्छा होती. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आझाद हिंद सेनेची स्थापना
वर्ष 1921 मध्ये प्रशाकीय सेवेतील प्रतिष्ठित नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत उतरलेले सुभाषचंद्र बोस यांना क्रांतिकारी विचारांमुळे देशातील युवकांचे मोठे समर्थन मिळाले. त्यानंतर त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. नेताजी यांनी आझाद हिंद सेनेत भरती होणाऱ्या युवकांना ‘‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा.'' ही घोषणा दिली. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचा कमांडर या नात्याने भारताला एक अस्थायी सरकार स्थापन केले. ज्याला जर्मनी, जपान, फिलीपाइन्स, कोरिया, चीन, इटली, मान्चुको आणि आयर्लंडने मान्यता दिली होती.
लालूंची प्रकृती आणखी खालावली; पुढील उपचारासाठी दिल्लीला नेणार
1980 पर्यंत साधूच्या वेशात भारतात वास्तव्य ?
नेताजी सुभाषचंद्र बोस 1950 च्या दशकापासून 1980 पर्यंतच्या दशकापर्यंत उत्तर प्रदेशमधील अनेक भागात एका साधूच्या वेशात राहत होते, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. माजी पत्रकार अनुज धर यांचे पुस्तक 'व्हॉट हॅपँड टू नेताजी?' मध्ये नेताजींच्या जीवन रहस्याच्या फैजाबाद मुद्द्यावर भर देण्यापूर्वी त्यांच्या मृत्यूच्या तीन प्रमुख तत्त्वांची विस्तृत माहिती आहे. अनुज धर यांच्यामते पंतप्रधानांकडे एक अति गोपीय फाईल होती, ज्यामध्ये बोस यांचे रहस्य होते. नेताजींशी निगडीत रहस्यांवर 15 वर्षांपर्यंत तपास करणाऱ्या धर यांच्या मते या फाईलमध्ये फैजाबाद येथील साधू भगवानजी हे खरे नेताजी सुभाषचंद्र बोस होते, हे स्वीकारलेले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या संपर्कात होते. अनुज धर यांनी आपल्या पुस्तकात दावा केला की, भगवानजी यांच्या दाताच्या डीएनएच्या अहवालात अधिकाऱ्यांनी बदल केले होते.
धक्कादायक खुलासा! माझं अपहरण करुन बोलायला भाग पाडलं, शेतकऱ्यांनी मीडियासमोर उभा केलेल्या शुटरचा दावा
आझाद हिंद सरकारने छापली होती 1 लाख रुपयांची नोट
आझाद हिंद सरकारची स्वतःची बँक होती. तिचे नाव आझाद हिंद बँक होते. आझाद हिंद बँकेची स्थापना 1943 मध्ये झाली होती. या बँकेला 10 देशांचे समर्थन होते. आझाद हिंद बँकेने 10 रुपयांच्या नाण्यापासून ते 1 लाखापर्यंतची नोट जारी केली होती. 1 लाख रुपयांच्या नोटेवर सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापला होता.
PM नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन; म्हणाले, ते आदर्शांवर ठाम असत
हिटलरशी झाली होती भेट
वर्ष 1942 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची भेट घेतली होती. परंतु, हिटलर यांना भारताच्या स्वातंत्र्यात काही स्वारस्य नव्हते. त्यांनी बोस यांना कोणतेच आश्वासन दिले नाही. त्यामुळे ते पुढे रशियाला गेले होते. 18 ऑगस्ट 1945 मध्ये तैवान येथे झालेल्या एका विमान अपघातात नेताजी यांचा मृत्यू झाला होता. परंतु, असे म्हटले जाते की, सुभाषचंद्र बोस हे त्यातून बचावले आणि तेथून ते रशियाला गेले होते. सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजही एक रहस्य आहे. भारत सरकारने त्यांच्याशी निगडीत माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या देशातील सरकारशी संपर्क साधला. परंतु, त्यांच्याबाबत काही विशेष माहिती मिळू शकली नाही. सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूवरुन अनेकप्रकारच्या गोष्टी रंगलेल्या आहेत.
Edited By - Prashant Patil