एकाच यूजर आयडीवरुन आता अनेकांना नेटफ्लिक्स पाहता येणार नाही

जे ग्राहक त्यांचे पासवर्ड इतर कुणाला शेअर करतात त्यांच्यासाठी नेटफ्लिक्स आता शुल्क आकारण्याचा विचार करत आहे.
Netflix
Netflixसकाळ डिजिटल टीम

चित्रपट, वेबसीरीज, सीरीअल्स, स्पोर्ट्स आणि न्यूज किंवा मनोरंजनासाठी ग्राहक ओटीटी प्लॅटफॉर्म वापरतात. ओटीटी प्लॅटफॉर्म हा मनोरंजनाचा एक उत्तम पर्याय आहे. नेटफ्लिक्स आता प्रेक्षकांसाठी अनोळखे राहिलेले नाही. नेटफ्लिक्सवर सर्व प्रकरच्या कथानकांचा समावेश असतो. नेटफ्लिक्स हे मनोरंजनासाठी ग्राहकांची पसंती आहे. नेटफ्लिक्सनं भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र आता नेटफ्लिक्सने त्यांच्या ग्राहकांसाठी नवी नियमावली काढत आहे. जे ग्राहक त्यांचे पासवर्ड इतर कुणाला शेअर करतात त्यांच्यासाठी नेटफ्लिक्स आता शुल्क आकारण्याचा विचार करत आहे.

एकाच सबस्क्रिप्शनवर अनेक जण नेटफ्लिक्सचा आनंद घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर नेटफ्लिक्सनं हा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ ऑथराईज्ड यूझरला नेटफ्लिक्स पाहता यावं यासाठी ही सिस्टीम असल्याचं नेटफ्लिक्सनं सांगितलंय. याची सध्या चाचणी सुरू असल्याचं माहिती समोर आली आहे.

Netflix
काँग्रेसला सर्वसमावेशी आणि सामुहिक नेतृत्वाची गरज; जी-२३ नेत्यांच्या बैठकीत चर्चा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनच्या किंमतीमध्ये मध्यंतरी कपात केली होती. नेटफ्लिक्सने सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला होता आणि याचा फायदाही नेटफ्लिक्स झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com