esakal | सुपरस्टार पवन कल्याणला #HappyBirthdayPawanKalyan ने दिल्या जाताहेत शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

सुपरस्टार पवन कल्याणला #HappyBirthdayPawanKalyan ने दिल्या जाताहेत शुभेच्छा

दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण याच्या वाढदिवसानिमित्त त्याला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळेच ट्विटरवर सध्या #HappyBirthdayPawanKalyan हा ट्रेंड सुरु आहे.

सुपरस्टार पवन कल्याणला #HappyBirthdayPawanKalyan ने दिल्या जाताहेत शुभेच्छा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण याच्या वाढदिवसानिमित्त त्याला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळेच ट्विटरवर सध्या #HappyBirthdayPawanKalyan हा ट्रेंड सुरु आहे.

पवन कल्याण याचा जन्म 2 सप्टेंबर, 1971 रोजी आंध्र प्रदेशातील बपाटला येथे झाला. उद्या (सोमवार) त्याचा 47 वा जन्मदिवस साजरा होत आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

पवन कल्याण यांचे मूळ नाव कोनिदेला कल्याण बाबू असे आहे. मात्र, चित्रपट सृष्टीत पवन कल्याण या नावाने ओळखले जाते. त्यांनी अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले. तसेच त्यांना लेखक म्हणूनही ओळखले जाते. तेलुगू चित्रपटात त्यांचे मोठे नाव आहे.

loading image
go to top