'आधार'चा 'तो' क्रमांक होतोय आपोआप सेव्ह; सत्य आणि अफवा

Never asked for such facility says Aadhaar authority
Never asked for such facility says Aadhaar authority

नवी दिल्ली : 'युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया'चा (यूआयडीएआय) हेल्पलाईन क्रमांक (1800-300-1947) कोणतीही अतिरिक्त माहिती न देता अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे. मात्र, या हेल्पलाईन क्रमांकाबाबत 'आधार'कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

देशातील अनेक मोबाईल युजर्सच्या फोनबुकमध्ये आधारचा हेल्पलाईन क्रमांक त्यांच्या कोणत्याही परवानगीशिवाय सेव्ह होत आहे. यावरुन फ्रेंच सुरक्षातज्ज्ञ इलियट अल्डरसन यांनी यूआयडीएआयला प्रश्न विचारला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, की भारतातील ग्राहकांच्या मोबाईलमध्ये आधारकार्डचा हेल्पलाईन नंबर सेव्ह झाला आहे. हा क्रमांक ग्राहकांच्या कोणत्याही परवानगीशिवाय त्यांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे, असे का करण्यात आले, याबाबत माहिती द्यावी, असे अल्डरसन यांनी 'यूआयडीएआय'ला विचारले. त्यावर आता यूआयडीएआयच्या उत्तराची अपेक्षा आहे.

UIDAI चे सत्य आणि अफवा
गेले काही तास अचानक काही मोबाईलमध्ये सेव्ह झालेला आधारचा संपर्क क्रमांक आणि त्याने आलेल्या अखंड अफवांचे पेव फुटलेले आहे. त्याबद्दल शक्य तेवढी सत्य माहिती व तर्क देत आहे. ज्याने निदान काही शंकाचे निरसन होईल. 

१. आपण फोन वापरत असताना जवळपास सर्वच अॅप ना "कॉन्टॅक्टस" ची परमिशन देतो. ही परमिशन दिल्यानंतर ते अॅप आपले सर्व कोंटक्ट्स वापरू तर शकतेच शिवाय आपल्याला न सांगता एखादा क्रमांक सेव्ह ही करू शकते. 

२. अँड्रॉईड ही ओ एस गुगल ची आहे, त्यामुळे त्यांना तर असे कॉन्टॅक्टस कधीही ऍड करता येणे अगदी सहज शक्य आहे. ते काही क्रमांक त्यांचा सेट अप विझर्डमध्ये देतात. 

३. त्यामुळे आता अचानक एखाद्या फोनमध्ये आधारचा कॉन्टॅक्ट नंबर दिसणे हे एखाद्या अॅपमुळे किंवा गुगलमुळे प्रोग्रामटीकली झालेले असू शकते. त्यात हॅकिंग वगैरे काही असायची शक्यता फारच कमी आहे .

४. धन्या राजेंद्रन यांच्या वॉलवर लिहिल्यानुसार गुगल च्या सेट अप विझर्डमध्ये हा क्रमांक २०१४ साली होता आणि तो त्यांनी सगळया ओ इ एम ना दिलेला होता. तो आता काही कारणाने ट्रिगर झाला असावा. ही कारणे एखाद्या अॅपचे अपडेट होणे इथपासून ओ एस चे अपडेट होणे अशी काहीही असू शकतात.

५. ही घटना सर्वच फोनवर घडलेली नाही कारण प्रत्येकाची अँड्रॉइडची व्हर्जन व ओ इ एम चे सिक्युरिटी फीचर्स वेगळे असतात. त्यामुळे ही घटना सार्वत्रिक नाही 

६. अशीही एक वेगळी शक्यता आहे की काही जणांकडे हा क्रमांक २०१४ पासूनच आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे पण आजवर तिकडे लक्षच गेलेले नाही. आज आधार म्हणले की एवढे संशयाचे भूत निर्माण केले आहे की आपल्याला ते आज जाणवले असावे.

७. युआयडीएआयने फक्त हे आम्ही केलेले नाही एवढाच खुलासा केला आहे. त्यामुळे, हे कोणी केले हे शोधण्यासाठी ज्यांच्याकडे हा नंबर दिसला त्यांचा मोबाईल डिव्हाईस, ओ एस व्हर्जन, त्यांच्या फोनवर असणारी अॅप असे बरेच मुद्दे तपासावे लागतील व त्यातून शोध घ्यावा लागेल, तसा शोध लोक घेत असतीलच. येत्या २४-४८ तासात सत्य बाहेर येईलच 

८. प्रथम दर्शनी तरी हा हॅकिंगचा प्रकार वाटत नाही. याचा आणि तुमच्या आधार सुरक्षिततेचा तरी शून्य संबंध आहे. 

९. आपण स्वतः च काही अॅप ना अगदी "रूट" परमिशन दिलेल्या आहेत, त्यामुळे आपला मोबाईल हा व्हलनरेबल आहे यात शंका नाही. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.  एखादा क्रमांक ऑटोमॅटिक सेव्ह होणे हा त्यातल्या त्यात सर्वाधिक हार्मलेस प्रकार आहे. याहून अजून डाटा चोरीच्या गोष्टी अँप्स मधून सुरू असतात. त्यामुळे, सध्या तरी तुम्ही निवांत राहायला हरकत नाही .

१०. एका अँड्रॉइड अॅप बनवणाऱ्या कंपनीचा चालक आणि सोशल मीडियाचा अभ्यासक या दोन्ही भूमिकेतून जेवढी माहिती मला आहे त्यावर वरील मुद्दे आधारीत आहेत. त्यात काही चूक असेल तर ती निदर्शनास आणून द्यावी, दुरुस्ती केली जाईल . जशी अधिक माहिती मिळेल तशी अपडेट करेलच.
- विनायक पाचलग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com