'Never Vote For BJP' ट्‌विटरवर ट्रेंड!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बॅंक व एटीएमच्या रांगेत उभे राहवे लागत असल्यामुळे या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी 'Never Vote For BJP' अशा ट्रेंडखाली ट्‌विट केले. आज हा ट्रेंड ट्‌विटरवर "टॉप टेन'मध्ये आला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बॅंक व एटीएमच्या रांगेत उभे राहवे लागत असल्यामुळे या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी 'Never Vote For BJP' अशा ट्रेंडखाली ट्‌विट केले. आज हा ट्रेंड ट्‌विटरवर "टॉप टेन'मध्ये आला आहे.

मोदींनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीनंतर बॅंका व एटीएम यंत्रणेवर ताण आला आहे. यामुळे पैसे मिळविण्यासाठी देशात ठिकठिकाणी नागरिक तासन्‌ तास रांगेत उभे राहत असल्याचे चित्र अनुभवायला मिळत आहे. मोदींच्या निर्णयाचे काहींनी स्वागत, तर काहींनी टीका केली आहे. भाजपला मत देऊ नका, असे आवाहन अनेक नेटिझन्सन ट्‌विटरच्या माध्यमातून करत आहेत. यामुळे 'Never Vote For BJP' हा ट्रेंड "टॉप टेन'मध्ये आला.

"मोदींनी सर्वसामान्य नागरिकांना बळजबरीने रांगेत उभे केले आहे, तर दुसरीकडे विजय मल्ल्या व अदानीचे कर्ज माफ केले आहे. यामुळे भाजपला मतदान करू नका,' असे ट्‌विट क्रिशन प्रताप सिंगने केले आहे. "शेतकरी व जवान हे आमचे खरे "हिरो' आहेत. भाजपने त्यांचा वापर करून निवडणूक जिंकली आहे, यामुळे भाजपला मत देऊ नका,' असे ट्‌विट अनुप अग्रवालने केले आहे.

काही ट्‌विट
Ashish Talwar Office @DelhiTalwar
MODI & BJP have not disappointed their Mandate, they have Murdered it.
Never Vote For BJP

Akshay Marathe @AkshayMarathe
Indians had voted for change in 2014. Not dictatorship. Not fascism. Not quackery. Not majoritarianis.
Never vote for BJP

ई-सकाळ प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना किती त्रास होत आहे हे कोणीही बघत नाही. कालची बातमी 20 किलो टोमॅटो हा 70 रुपयांनासुद्धा कोणीही विकत घेत नव्हता, कारण विकत घ्यायला पैसे नाहीत. पैसे आहेत पण ते बॅंकेत आहेत आणि ते काढायला मर्यादा आहे; याला कोण जबाबदार आहे. यामध्ये शेतकऱ्याची काय चूक. 500 आणि 1000च्या नोटा बंद करायच्या होत्या, तर आधी योग्य तयारी का नाही केली? ती जर केली असती तर हे प्रश्नच उद्‌भवले नसते.
- धीरज पाटील, वाचक

Web Title: Never Vote For BJP trend on twitter