लष्करामध्ये येणार नवीन 100 हॉवित्झर तोफा- संरक्षण मंत्री

लष्करामध्ये येणार नवीन 100 हॉवित्झर तोफा- संरक्षण मंत्री

नाशिक : लष्करामध्ये नवीन 100 हॉवित्झर तोफा येणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.09) सांगितले. त्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. या 100 तोफांपैकी 10 तयार आहेत. तर 90 भारतात असेंम्बल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, लष्करांमध्ये 145 वज्रही दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामधील 120 वज्र देशात तयार होणार आहेत असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

यावेळी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि लष्करप्रमुख बिपीन रावत हेही उपस्थित होते. यावेळी के 9 वजर, हॉवित्झर अल्ट्रा लाईट गन, गन टोइग यांचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
 
पुढे बोलताना सीतारामन म्हणाल्या की, 20 वर्षानंतर लष्करात नवीन शस्त्र दाखल होत आहे हे सत्तेतील सरकारमुळे शक्य झाले आहे. सरकारने 4 वर्षात कारभारात गतिमानता आणली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी पुढील वर्षी लष्करात नवीन धनुष्यही दाखल होणार असल्याची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com