ड्रेनेजमध्ये आढळले नवजात अर्भक

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

'हे बाळ स्वातंत्र्यदिनी सापडल्याने तिचे नाव सुथनथिरम (तमिळ भाषेत स्वातंत्र्याचा अर्थ) असे ठेवले आहे. मला आनंद होत आहे की तिला स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य मिळाले,' अशा भावना गीता यांनी व्यक्त केल्या.

चेन्नई : चेन्नईतील वलासरवक्कम या भागात एका ड्रेनेजमध्ये नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्यदिनी (ता. 15) या भागातील गीता यांना परिसरात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, त्यांना ड्रेनेजच्या आत वाईट परिस्थितीत एक नवजात बालक आढळले, त्याची नाळही अजून तशीच होती.

गीता यांनी बाळाला कुशीत घेऊन, त्याचे हात-पाय चोळले, त्यानंतर बाळाला दवाखान्यात नेण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ पुसून काढले. या बाळाला श्वसनास त्रास होत होता. उपचारानंतर या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. 

'हे बाळ स्वातंत्र्यदिनी सापडल्याने तिचे नाव सुथनथिरम ('स्वातंत्र्य' या शब्दाचा तमिळ भाषेतील अर्थ) असे ठेवले आहे. मला आनंद होत आहे की तिला स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य मिळाले,' अशा भावना गीता यांनी व्यक्त केल्या. तसेच पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. 

Web Title: a new born baby found in drainage in chennai