Modi Cabinet : अमित शहा अर्थमंत्री की गृहमंत्री? आज कळेल!

Narendra Modi Amit Shah
Narendra Modi Amit Shah

मोदी शपथविधी : नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज (शुक्रवार) सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. मोदी यांच्यासह शपथ घेतलेल्या ५८ जणांकडील खातेवाटपही आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपला दणदणीत विजय मिळवून देणारे अध्यक्ष अमित शहा यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अर्थ किंवा गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण २५ कॅबिनेट मंत्री, २५ राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले ९ राज्यमंत्री यांचा समावेश आहे. 

राजनाथसिंह, निर्मला सीतारामन , पीयूष गोयल, स्मृती इराणी आणि नितीन गडकरी यांच्याकडील खातेवाटपाविषयीही उत्सुकता आहे. प्रकृतीच्या कारणामुळे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज या ज्येष्ठ आणि  अनुभवी नेत्यांनी मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांकडे अनुक्रमे अर्थ मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी होती.

या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५.३० वाजता मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल. तत्पूर्वी, आज सकाळपासून पंतप्रधान मोदी यांनी विविध देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली. या चर्चांदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवालही उपस्थित होते. त्यामुळे दोवाल यांचेही पद कायम राहणार असल्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com