1.34 कोटींच्या नव्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

चेन्नई : येथील विमानतळावर गुरुवारी पहाटे 1 कोटी 34 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व नोटा 2000 रुपयांच्या आहेत.

नोटाबंदीनंतर देशभरात छापे टाकण्याच्या आणखी कारवाया समोर येत आहेत. प्राप्तिकर विभागाची पथके विविध ठिकाणी छापा टाकत आहेत. 
याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 34 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. हा पैसा कोणाचा आहे आणि तो कुठे घेऊन जात होते, याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, तामिळनाडूत मागील अनेक दिवसांपासून प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरू आहे. 

प्राप्तिकर विभागाने काल (बुधवार) तामिळनाडूचे मुख्य सचिव राममोहन राव यांच्या अण्णा नगरमधील घरावर छापा टाकला. या छाप्यातून 30 लाख रुपयांच्या नव्या नोटा आणि पाच किलो सोने जप्त करण्यात आले. हा छापा शेखर रेड्डीकडून मिळालेल्या माहितीवरुन टाकला होता.
 
Web Title: new currency notes worth 1.34 crore seized in chennai