दिल्लीत 'आप' आमदाराच्या निवासस्थानी छापा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार करतारसिंह तंवर यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ झाली आहे. दिल्लीतील आपच्या आमदारांवर यापूर्वी कारवाई झालेली आहे. आता करतारसिंह तंवर अडचणीत आले आहेत. आज सकाळी साडेआठ वाजता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी निवासस्थानी छापा टाकला. याबरोबरच दिल्लीतील अन्य अकरा ठिकाणीही चौकशी करण्यात येत आहे. करतारसिंह यांच्या मालकीच्या 20 कंपन्या आहेत.

या छापेमारीप्रकरणी दिल्लीचे परिवहन मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकार आणि भाजपला लक्ष्य केले आहे. प्राप्तिकर विभाग, सीबीआय, ईडी, आयबी या सर्वांना आमच्याविरोधात कामाला लावण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच म्हटले आहे, की मोदी सरकार आमच्या मागे लागले आहे.

Web Title: New Delhi, AAP MLA's residence raided