नवी दिल्ली : अग्नीपथ' प्रचारासाठी भाजप नेते लागणार कामाला

भाजपने आपल्या नेत्यांना विशेषतः तरूणांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले
Agneepath scheme  recruitment in army
Agneepath scheme recruitment in army sakal

नवी दिल्ली : देशाच्या सैन्यदलांमध्ये कंत्राटी भरतीची तरतूद असलेल्या ‘अग्नीपथ' योजनेचा देशभरात, आपापल्या मतदारसंघात जोमाने प्रचार प्रसार करा असे आदेश भाजपने आपले देशभरातील लोकप्रतिनिधी व नेत्यांना दिले आहेत. या योजनेला देशाच्या अनेक राज्यांतील तरूणांकडून कडाडून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी भाजपची सारी यंत्रणा कामाला लागली आहे. यासाठी लवकरच ठिकठिकाणी ‘जनसंवाद' कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या तयारीत सत्तारूढ पक्ष आहे. भाजपची सध्याची रणनीती पाहिली तर आंदोलन मोडून काढण्यासाठी शेतकरी आंदोलनावेळी वापरलेल्या मार्गानेच भाजप नेतृत्व पुढे जात असल्याचे दिसते.

भाजपच्या सर्वोसर्वा नेतृत्वाने पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यमार्फत पक्षाचे सारे खासदार, प्रदेशाध्यक्ष व मंत्र्यांसह प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून अग्नीपथचा प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपची याबाबतची योजना पाहिली तर शेतकरी आंदोलनाप्रमाणेच भाजपचे डावपेच दिसत आहेत. अग्मीपथच्या प्रचारासाठी आधी पक्षनेते व नंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा अग्नीपथबाबत मैदानात उतरतील अशा हालचाली आहेत. काही राजकीय पक्ष (खासकरून कॉंग्रेस, तृणमूल, राष्ट्रीय जनता दल आदी) देशहिताच्या या योजनेला खीळ घालण्याचे उद्योग मुद्दाम करत आहेत असा भाजपचा आरोप आहे.

पक्षनेते कैलास विजयवर्गीय काल इंदोरमध्ये जे बरळले त्यामुले पक्षाची चांगलीच कुचंबणा झाली असून ‘‘अग्नीपथ'च्या बाजूने बोलताना भान बाळगा,‘‘ असेही निर्देश दिले गेले आहेत. मात्र आंदोलनकर्ते तरूण शांत होण्याच्या मुस्थितीत नाहीत. कोणाही संबंधितांशी चर्चा न करताच देशाच्या लष्करासारख्या अतीसंवेदनशील विषयावर मनमर्जी पध्दतीने आणखी एक अतिशय घातक निर्णय घेऊन टाकल्याचा आरोप विरोधक व आंदोलनकर्ते सत्ताधारी नेतृत्वावर करत आहेत.

भाजपने आपल्या नेत्यांना विशेषतः तरूणांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी एक व्यापक कार्यक्रम तयार केला जात आहे. सारे केंद्रीय मंत्री कोठे कोठे जाऊन पत्रकार परिषदा घेणार याची आखणी करण्यात येत आहे. अग्नीपथ ही कशी देशाच्या हिताची योजना आहे व त्यामुले तरूणांचे कसे भले होईल हे तरुण पिढीला समजावून सांगा, तरूणांना विश्वासात घ्या, अशा सूचना पक्षनेत्यांना दिल्या गेल्या आहेत. अनेक उद्योगपतींशीही पक्षाच्या वरिषअठ पातळीवरून संवाद साधण्यात आला आहे. दिल्लीतील राष्ट्रीय मुख्यालयात अग्नीपथ चे गुणगान करणाऱ्या व कॉंग्रेसवर टीका करणाऱया रोज किमान २ ते ३ पत्रकार परिषदा रोज घेण्याचेही पर्मान काडण्यात आले आहे. याशिवाय लष्करप्रमुख मनोज पांडे, हवाई दलप्रमुख व्ही आर चौधरी व नौदल प्रमुख हरी कुमार यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय वाहिन्यांवर जाऊन अग्नीपथ चे फायदे, त्यामुळे तरूणांमधील रोजगार निर्मितीत वाढ आदी फायदे वारंवार समजावून सांगावे अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत.

योजना जाहीर होऊन ८ दिवस उलटल्यानंतर, ‘अग्नीपथ'बाबत लष्कराच्या पातळीवर गेली दोन वर्षे व्यापक चर्चा सुरू होती हे सांगण्यात आले. या चर्चेत सहभागी कोण कोण झाले होते याची माहिती सैन्य अधिकारी देत नाहीत. अग्नीपथ च्या समर्थनासाठी मोजकेच मुद्दे हाताशी असल्याने तेच मुद्दे भाजपचे किती नेते, किती वेळा सांगणार? त्यामुळे तरूणांचे कसे समाधान होणार हे प्रश्न भाजप नेतृत्वाच्या दृष्टीने ‘अदखलपात्र' आहेत.

दरम्यान भाजप खासदार वरूण गांधी यांनी आज पुन्हा अग्नीपथ वर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही योजना रद्द करावी अशी मागणी गांधी यांनी केली आहे. या योजनेचा कही फायदा होणार नाही व तरूणांचा असंतोष वाढत गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो असाही इशारा वरूण गांधींसह अनेक नेत्यांनी दिला आहे.

आनंद महिंद्रा यांचा पाठिंबा

दरम्यान उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या योजनेच्या विरोधासाठी होणाऱया हिंसाचारावर तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की ४-४ वर्षांनी सेवामुख्त केल्या जाणाऱया ७५ टक्के अग्नीवीरांसाठी महिंद्रा ॲंड महिंद्रा उद्योगसमूहाने एक योजना तयार केली आहे. या प्रशिक्षित तरूणांसाठी खासगी व भांडवली क्षेत्रात रोजागराच्या अपार संधी आहेत. अग्नीवीरांचे शिस्तबध्द प्रशिक्षण त्यांना रोजगार निर्मितीसाठी सुयोग्य बनवेल याचा मला विश्वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com