दिल्लीत ‘आप’; भाजपचा सुफडा साफ

नवी दिल्ली - नवी दिल्ली नगरपालिका पोटनिवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयी उमेदवारांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया.
नवी दिल्ली - नवी दिल्ली नगरपालिका पोटनिवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयी उमेदवारांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया.

नवी दिल्ली - नवी दिल्ली नगरपालिकांच्या ५ पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला अस्मान दाखवत ५ पैकी ४ जागा जिंकल्या आहेत. एका जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाला. पुढील वर्षी होणाऱ्या दिल्लीच्या महापालिका निवडणुकांची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या या निवडणुका लहान असल्या तरी त्यातील भाजपचा दणकून झालेला पराभव सूचक आहे. 

दिल्लीतूनच देशाचा कारभार करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या कामाविरूध्दची नाराजी व संताप दिल्लीकरांनी गेल्या २ वर्षांत दुसऱ्यांदा पुन्हा दाखवून दिला आहे. दरम्यान भाजपने, दिल्ली पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये काही विशेष नाही, असे म्हटले आहे. गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपच्या विजयाबद्दल अत्यानंद व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की दिल्लीत ज्यांच्याकडे (आप) ज्या जागा होत्या त्यांनी त्या जिंकल्या. त्यात काय झाले ? प्रत्यक्षात शालीमार बागेसारखी प्रतिष्ठेची व वर्षानुवर्षे भाजपच्या ताब्यात राहिलेली जागाही भाजपने यंदा गमावली आहे. शालीमार बागेत भाजप नेत्या रेणू जाजू यांची सून सुरभी यांना आपच्या सुनीता मिश्रा यांनी तब्बल २७०० हून जास्त मतांनी हरविले आहे. या पराभवाचे राज्य भाजप विश्‍लेषण करेल असे दिल्ली भाजपचे ज्येष्ठ नेते साम जाजू यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपने कोणत्याही निवडणुकीप्रमाणे दिल्लीत पोटनिवडणुकीही सारा जोर लावला होता. २८ फेब्रुावारीला झालेल्या पोटनिवडणुकीत ५० टक्केहून जास्त मतदान झाले होते. दिल्लीचे सारे खासदार, आमदार, अनेक केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय नेते अशी फौज येथे कामाला लागली होती. मात्र मोदी सरकारने दिलेला पेट्रोल डिझेल व गॅसच्या व अन्य महागाईचा शॉक व जनताविरोधी धोरणांचे पडसाद पोटनिवडणुकीत उमटले. दिल्लीत त्रिस्तरीय रचना असते. केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिका किंवा पालिका परिषद असा हा पॅटर्न असतो. मात्र दिल्लीकर प्रत्येक निवडणुकीत वेगळी समीकरणे लावतात.

दिल्लीच्या जनतेने केजरीवाल यांच्या राजकारणावर पुन्हा विश्‍वास दाखविला. या नगरपालिकांत भाजप गेली १५ वर्षे सत्तेत आहे. येथे ज्या पध्दतीने यात भाजपचा "सुफडा साफ'' झाला त्यातून जनता भाजपच्या कारभारामुळे दुःखी व त्रस्त आहे, हे दिसून आले. पुढील वर्षीच्या महापालिका निवडणुकाही केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणावरच लढवेल. 
- मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री

विजयी उमेदवार 

  • त्रिलोकपुरी - विजयकुमार (आप) 
  • कल्याणपुरी - धीरेंद्रकुमार (आप) 
  • शालीमार बाग - सुनिता मिश्रा (आप) 
  • उत्तर रोहिणी - रामचंद्र (आप) 
  • चौहान बांगड़ - जुबेर अहमद (काँग्रेस) 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com