प्रसंगी नियंत्रण रेषाही ओलांडू : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

नवी दिल्ली : दहशतवादी हाफीज सईद याला राजकीय वलय दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज पाकिस्तानवर खरमरीत टीका केली. तसेच सीमांचे संरक्षण करण्यासाठी गरज भासल्यास भारतीय लष्कर नियंत्रण रेषाही ओलांडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राजनाथसिंह यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. "जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून, येथील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भारतातूनच सीमांचे संरक्षण करण्यास सक्षम आहोतच; मात्र आवश्‍यकता भासल्यास या सीमा ओलांडण्याचीही आमची तयारी आहे. आम्हाला पाकिस्तानबरोबर शांततापूर्ण संबंध निर्माण करायचे असले तरी त्यांना यात रस नाही. यापेक्षा त्यांना हाफीज सईदसारख्या दहशतवाद्याला राजकीय वलय देणे आवश्‍यक वाटते. हाफीज आता पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवून त्यांच्या संसदेतही प्रवेश करेल. अनेकांचे बळी घेणाऱ्या हक्कानी नेटवर्कलाही पाकिस्तानमध्ये संरक्षण दिले जाते,' असे राजनाथ म्हणाले.
 
दहशतवादाविरोधातील लढाईला आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळविण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला प्रचंड यश आल्याचा दावाही राजनाथसिंह यांनी केला. आधी पाकपुरस्कृत दहशतवादाबाबत कोणीही बोलत नव्हते, आता संयुक्त राष्ट्रसंघानेही पाकिस्तानचा निषेध केला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: new delhi indian army border pakistan rajnath singh