90 मिनिटांत राफेलबद्दल चकार शब्दही नाहीः राहुल

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत 90 मिनिटे बोलले. परंतु, राफेल विमानांच्या खरेदी व्यवहाराबाबत एक शब्दही बोलले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) केली.

लोकसभेत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. यावेळी विरोधी पक्ष काँग्रेसचे खासदार आणि तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'झुठे आश्वासन बंद करो', 'झुठा भाषण बंद करो' या जोरदार घोषणाबाजीतच मोदींनी आपले भाषण पूर्ण केले.

गांधी म्हणाले, 'मोदी सरकारला चार वर्षे झाली तरीही ते आरोपच करत आहेत. यशाबद्दल त्यांनी बोलायला हवे. मोदींनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले. भ्रष्टाचाराचे काय झाले? राफेल विमानांच्या खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत मोदी 90 मिनिटांच्या भाषणांत एक शब्दही बोलले नाहीत. त्यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे.'

'2014 पूर्वीच्या निवडणूकीचे हे काही भाषण नाही. तरी ते 60 वर्षापुर्वीचे बोलत आहेत. आता ते सत्तेवर असून, त्यांच्या हातात सत्ता आहे. विरोधी नेते नाहीत. त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे ते टाळत आहेत. कारण काय? बहुदा ते पंतप्रधान असल्याचे विसरले आहेत. सत्तेवर येऊन चार वर्षे झाली, त्यांनी युवकांच्या नोकऱयांसाठी व शेतकऱयांसाठी काय केले? त्यांचे प्रत्येक भाषण हे काँग्रेस विरोधी असते. मोदीजींना एक प्रश्न विचारायचा आहे की, दोन कोटी जणांना नोकऱया देणार होतात, शेतकऱयांना आश्वासने दिली होती, त्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्नही गांधींनी उपस्थित केला.

Web Title: new delhi loksabha rafale pm narendra modi congress rahul gandhi