नवी दिल्ली : जेएनयूत झालेल्या हिंसाचारानंतर नवा विवाद

जेएनयूतील कावेरी वसतीगृहाच्या मेसमध्ये काल दुपारी हा वाद पेटला व त्यातून रात्री दोन गटांत तुफान राडा झाला.
JNU
JNUSakal
Summary

जेएनयूतील कावेरी वसतीगृहाच्या मेसमध्ये काल दुपारी हा वाद पेटला व त्यातून रात्री दोन गटांत तुफान राडा झाला.

नवी दिल्ली - रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी मांसाहारास परवानगी, इफ्तार पार्टीत मासाहारी पदार्थांना विरोध त्याचबरोबर येथे पूजा केल्याच्या मुद्यावरून दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) (JNU) झालेल्या हिंसाचारानंतर (Violence) येथील वातावरण पुन्हा चांगलेच तापले आहे. यावरून डाव्या विद्यार्थी संघटनांनी (Students Organization) आज दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर अभाविपच्या हिंसाचाराविरूध्द प्रदर्शने (Agitation) केली. दुसरीकडे भाजपने हा हिंसाचाराचा मुद्दा माकप सरचिटणीस सीताराम येच्युरी यांची त्या पक्षाच्या सर्वोच्च नेतेपदी पुन्हा निवड होण्याबरोबर जोडला आहे. जेएनयू हा डाव्या चळवळीचा गड मानला जातो.

जेएनयूतील कावेरी वसतीगृहाच्या मेसमध्ये काल दुपारी हा वाद पेटला व त्यातून रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. यातील हिंसाचाराचा एक नवा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. रामनवमीच्या दिवशी आपण विद्यापीठातील मांसाहाराच्या मुद्यावर आक्रमक रहाणार असल्याचे अभाविपने शनिवारीच जाहीर केले होते. जेएनयूतील ‘फ्री सेक्स' सह अनेक मद्यांवर अभाविपने वारंवार तीव्र विरोध केलेला आहे. मोदी सरकारने विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शांतिश्री पंडित यांची नियुक्ती केल्यानंतर वातावरण पुन्हा तप्त बनू लागले आहे. पाठोपाठ आता मासाहाराचा मुद्दा तापला आहे. यापूर्वी डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमात कथीत देशविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सध्या कॉंग्रेसवासी झालेले विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार त्या प्रकरणात सध्या जामीनावर आहेत.

कावेरी वसतीगृह हे विकलांग विद्यार्थ्यांसाठी आहे. अभाविपने हिंसाचार परसविल्यावरून एसएफआ, डीएसएफ व एआयएसए या डाव्या संघटनाच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांविरूध्द पोलिसात धाव घेतली. अबाविपच्या कार्यकर्त्यांच्याविरूध्दही पोलिसांत तक्रार दाखल झाली. दिल्ली पोलिसांनी अज्ञात विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

रामनवमीच्या दिवशी कावेरीच्या मेसमध्ये मांसाहारी जेवण बनवू नये असा दबाव भाजपने आणला त्याला डाव्या संघटनांनी विरोध केला. राज्यघटनेने दिलेल्या ‘खाण्याचा हक्क' या मुलभूत अधिकाराविरोधात अबाविपची ही दंडोली सुरू असल्याचे डाव्या विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. रामनवमीनिमित्त होमहवन सुरू असताना डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा अभाविपचा आरोप आहे. यात किमान १८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. काल या मेसवर दगडफेक झाली त्यात काचा फुटल्या व अनेक विद्यार्थीही जखमी झाले. अभाविपचे जेएनयू अध्यक्ष रोहित कुमार यांनी सांगितले की साडेतीन वाजता रामनवमीच्या पूजेचे आयोजन केले गेले. मात्र डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी साडेपाचला विरोध सुरू केला व रात्री साडेआठनंतर सशस्त्र विद्यार्थ्यांनी अभाविप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

जेएनयूमधील इफ्तार पार्टीत कधीही मासाहारी पदार्थ बनविले जात नाहीत. केवळ कस्टर्ड, फळफळावळ ठेवली जाते. मात्र यंदा मुद्दाम तसे केले गेले. रामनवमीला आमच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हे कारस्थान केले गेले. जेएनयूला बदनाम करण्यासाठी डाव्या संघटनांनी केलेले हे कारस्थान असल्याचाही त्यांनी आरोप केला. जेएनयूमध्ये डाव्या संघटनांच्या पायाखालची जमीन वेगाने घसरू लागल्यानेच त्यांचा हिंसाचार सुरू असल्याच त्यांनी सांगितले.

दुसरीकडे माजी अध्यक्षा एन साईबाला यनी, अभविप च्या गटाने आम्हाला मारहाण केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की कोणाला मांसाहार करायचा नसेल तर त्यांनी करू नये पण दुसऱयावर तसे लादण्याचा अभाविपचा प्रकार घटनाबाह्य व हिंसाचाराचा आहे. रामनवमीला मासाहारावर बंदी साऱया देशात कोठेही नसते. हिंदू-मुस्लिम ॲंगल जोडण्यासाठीच अभाविपने हा बनाव रचल्याचा आरोप त्यांनी केला. कावेरी च्या जेवणाच्या ठेकेदाराला अभाविपकडून सातत्याने धमक्या मिळत असल्याचा आरोप विद्यार्ती नेते ओसामा, रागीव आदींनी केला आहे. घटनेवेळी पोलिस विद्यापीठात हजर असूनही त्यांनी बघ्याची भूमिकाघेतली असा आरोप करून डाव्या संघटनांच्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी वसंत कुंज पोलिस ठाण्याला काल रात्री घेराव घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com