डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान डोकलाममध्ये सुरू असलेल्या पेचावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चीन या संदर्भात सकारात्मक पावले उचलेल, अशी आशा व्यक्त केली.

भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की भारताला शांतता हवी असल्याचा संदेश सर्व शेजारी देशांना देण्याची आमची इच्छा आहे. भारतीय सुरक्षा दल देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, की आमच्या सुरक्षा दलांकडे भारतीय सीमांचे संरक्षण करण्याची पूर्ण ताकद आहे. आयटीबीपी जम्मू-काश्‍मीरपासून अरूणाचल प्रदेशपर्यंतच्या 4,057 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेचे संरक्षण करत आहे.

भारतीय सुरक्षा दलांनी सिक्कीम सेक्‍टरच्या डोकलाम भागात चिनी लष्कराकडून सुरू असलेले रस्तेनिर्मितीचे काम थांबवले होते. तेव्हापासून भारत आणि चीनदरम्यान अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही आमच्या क्षेत्रात रस्त्यांची निर्मिती करत होतो, असा दावा चीनने केला आहे. त्याच वेळी ते वादग्रस्त डोकलाम भागातून भारतीय लष्कराला परत बोलविण्याची मागणीही करत आहेत. भूतानच्या म्हणण्यानुसार, डोकलाम त्यांचा भाग आहे. मात्र, चीन या भागावर आपला दावा सांगत आहे.

Web Title: new delhi new sdoklam issue and rajnath singh