"आधार'सक्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका

वृत्तसंस्था
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामींचा दावा

नवी दिल्ली: "आधार कार्ड'ची सक्ती करण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा दावा भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज केला. या प्रकरणी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही स्वामी यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात सरकारचा "आधारसक्ती' करण्याचा निर्णय टिकू शकणारा नाही, असे सांगत हा निर्णय न्यायालयात रद्द होणार असल्याबाबत आपल्याला खात्री असल्याचेही स्वामी यांनी म्हटले आहे.

"आधार'सक्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याबद्दल लवकरच मी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणार आहे. सर्वोच्च न्यायालयही हा निर्णय रद्द करेल असे मला वाटते, असे "ट्‌विट' स्वामी यांनी केले आहे. मोबाईल क्रमांकांना "आधार' जोडणी सक्तीची करण्याच्या केंद्राच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर एकत्रित घटनापीठापुढे सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी वरील वक्तव्य केले आहे.
सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही "आधार' बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. स्वामी यांनी यापूर्वीही "आधार'च्या अंमलबजावणीवर टीका केली होती.

Web Title: new delhi news aadhar card and national security risks