आंदोलन सुरूच राहणार ः हजारे

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

नवी दिल्ली: लोकपाल नियुक्ती आणि अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. प्रकृती ढासळत असली, तरी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

"माझा रक्तदाब कमी झाला असून, कमी बोलण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे,' अशी माहिती हजारे यांनी दिली. रामलीला मैदानावर हे आंदोलन सुरू आहे. केंद्र आणि राज्यांत लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्‍त्या कराव्यात, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

Web Title: new delhi news anna hazare strike