जलद गतीने सुनावणीला केजरीवालांचा विरोध

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

उच्च न्यायालयाची याचिकेवरून फटकार

नवी दिल्ली : अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात जलद गतीने सुनावणी करण्याच्या न्यायाधीशांच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना फटकारले.

उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या यासंबंधीच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला. जेटली यांनी केजरीवाल यांच्यासह आपच्या पाच अन्य नेत्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने सांगितले, की खटल्यांची सुनावणी जलद गतीने करणे हे आमचे कर्तव्य आहे. जलद गतीने सुनावणी करण्याचा निर्णय घेणे ही न्यायाधीशांची चूक म्हटली जाऊ शकत नाही.

यापूर्वी कथितरीत्या खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल केजरीवाल यांच्या विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नव्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आज उत्तर मागितले होते. अब्रुनुकसानीच्या खटल्यात केजरीवाल यांनी त्यांच्या वकिलांना जेटली यांच्याविरुद्ध अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यास सांगितले नव्हते, असे चुकीचे विधान प्रतिज्ञापत्रात करण्यात आले असल्याचा आरोप आहे. न्यायाधीश मनमोहन यांनी यासंबंधी केजरीवाल यांना नोटीस जारी करताना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होईल.

Web Title: new delhi news arvind kejriwal and court