आसाराम बापू खटला: संथगतीमुळे न्यायालयाने गुजरात सरकाला फटकारले

पीटीआय
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: बलात्कारप्रकरणी अटकेत असलेला वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधातील खटला संथगतीने चालविला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च्च न्यायालयाने गुजरात राज्य सरकारला धारेवर धरले. याप्रकरणी अधिक वेळ न दवडण्याची तंबी न्यायालयाकडून गुजरात राज्य सरकारला दिली आहे.

न्या. एन. व्ही. रमन्ना आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठासमोर सोमवारी खटल्याची सुनावणी झाली. बलात्कार झालेल्या तरुणीची चौकशी अद्याप का झाली नाही, असा प्रश्‍न करून खंडपीठाने सरकारवर नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश देऊन पुढील सुनावणी दिवाळीनंतर घेणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. या खटल्यातील फिर्यादींच्या साक्षीचे पुरावे निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 12 एप्रिल रोजी गुजरातमधील न्यायालयाला दिले होते.

सुरतमधील दोन बहिणींनी केलेल्या बलात्काराच्या आरोपावरून आसाराम बापू 2013 पासून तुरुंगात आहे. लैंगिक अत्याचारप्रकरणी त्याच्यावर राजस्थान व गुजरातमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. बापूच्या प्रकृतीचे व अन्य कारणे देऊन जामिनासाठी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळला आहे.

Web Title: new delhi news asaram bapu rape case court and gujrat government