भाजपच्या कामामध्ये संघाचा हस्तक्षेप नाही: सरसंघचालक भागवत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: भाजपच्या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणताही हस्तक्षेप करत नाही, असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला आहे. इंडिया फाउंडेशनच्या संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ट्‌विटरवर एखाद्याला ट्रोल करण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना, अशा प्रकारांना संघ वा संघविचारांचे लोक कधीही पाठिंबा देणार नाहीत वा ते करणारही नाहीत, अशी भावनाही व्यक्त केली.

संघाचे माजी प्रवक्ते व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव हे प्रमुख असलेल्या इंडिया फाउंडेशनच्या वतीने भागवत यांच्याशी विविध देशांच्या राजकीय जाणकार व मुत्सद्यांबरोबर चर्चा संवादाचा कार्यक्रम झाला. या वेळी भाजपबरोबरचे संघाचे संबंध, आपल्या मातृसंस्थेबद्दल वर्तमान भाजप नेतृत्वाचा दृष्टिकोन याबाबत भागवत यांना विचारण्यात आले. त्याला त्यांनी "संघ भाजपला चालवत नाही व भाजप संघाला चालवत नाही,' असे उत्तर दिले. ते म्हणाले, की स्वयंसेवक या नात्याने दोन्ही संस्थांमध्ये संवाद व चर्चा जरूर असते. सल्लामसलत जरूर करतो; मात्र एका दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप नसतो, कारण दोन्हीही अत्यंत स्वतंत्र व वेगवेगळ्या क्षेत्रांतील व भिन्न कामकाजाच्या संघटना आहेत.

इंटरनेट वा ट्‌विटवर एखाद्यावर टीकेचा मारा करणे (ट्रोलिंग) संघ कधीही मान्य करत नाही व आमचा त्यांना पाठिंबाही नाही, अशी भूमिका भागवत यांनी घेतली. ते म्हणाले, की ट्रोलिंग हीच अभिरूचीहीनता आहे. आक्रमक भूमिका घेणाऱ्यांचे संघ समर्थन करत नाही. ते म्हणाले, की संघ आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत एक लाख 70 हजार सेवाकार्यांचे संचलन करतो. ती पाहण्यासाठी राजकीय जाणकारांनी जरूर यावे, असे आवतणही त्यांनी दिले.

Web Title: new delhi news BJP does not interfere in work: mohan Bhagwat