दिल्लीत बसमध्ये जवानाने महिलेला मारला 'डोळा'

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

नवी दिल्लीः बसमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने (बीएसएफ) एका महिलेला डोळा मारल्याची घटना घडली. महिलेच्या तक्रारीनंतर जवानाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करत असलेली चोवीस वर्षीय महिला डीटीसीच्या बसमधून प्रवास करत होती. महिलांसाठी राखीव असलेल्या आसनावर ती बसली होती. तिच्या समोर 'बीएसएफ'चा जवान चरण सिंग उभा राहिला होता. प्रवासादरम्यान तो तिच्याकडे पाहून स्मितहास्य करण्याबरोबरच डोळा मारत होता. याबद्दल तिने जाब विचारत चालकाला बस थांबविण्यास सांगितले. बसमधून उतरून तिने तक्रार दाखल केली.

सिंगला अटक करण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. घटना घडली त्यावेळी तो सुट्टीवर होता. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: new delhi news BSF constable held for winking at woman on DTC bus