निर्धारित वेळेत बुलेट ट्रेन धावणारच

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

केंद्राचा ठाम दावा ः नव्या गोष्टीला विरोध नवीन नाही

नवी दिल्ली: सारे अडथळे पार करून मुंबई- अहमदाबाद ही बुलेट ट्रेन निर्धारित वेळेत धावणारच, असे केंद्राने ठामपणे म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या दिल्ली मेट्रोला, तसेच प्रमोद महाजन मोबाईल घेऊन फिरत तेव्हा त्या मोबाईललाही आपल्या देशात असाच तीव्र विरोध झाला होता व दोन्हीबाबत आज काय चित्र दिसते, असा प्रतिप्रश्‍न केंद्रातील एका ज्येष्ठ भाजप नेत्याने आज केला.

ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या आरोपांमुळे भाजपला फारसे नुकसान झालेले नाही, कारण सिन्हांचे नैराश्‍य व हताशपणा त्यांच्या प्रत्येक आरोपातून दिसतो, असेही त्यांनी सांगितले.

भाजप मुख्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना हे नेत्याने सांगितले, की देशाला प्रगतिपथावर नेणारी नवीन गोष्ट आली की तिला विरोध होणे हे आपल्या देशात नवे नाही. राजीव गांधी यांना संगणकाचा प्रसार करतेवेळी, प्रमोद महाजन यांना मोबाईलच्या वेळी असाच विरोध झाला होता. मुळात बुलेट ट्रेनचे काम सुरू होण्यास आणखी वर्षभर लागेल, तोवर सध्याचा राजकीय विरोध मावळलेला असेल, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आगामी गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजप जबरदस्त विजय मिळवेल, असेही या नेत्याने आत्मविश्‍वासाने सांगितले.
महाराष्ट्रात नवा पक्ष काढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या "एनडीए'मधील समावेशाबाबत स्पष्ट न सांगता ते म्हणाले, की राणे यांची शक्ती राज्यात आहे हे मान्य करावे लागेल. त्यांच्या ताकदीचा फायदा भाजपला होईल. मात्र, राज्यातील फडणवीस सरकारला नजीकच्या काळात काहीही धोका नाही हे माध्यमांनी नीट समजून घ्यायला हवे.

केरळमध्ये माकप सरकारच्या हिंसाचाराविरुद्ध भाजप उद्यापासून (ता. 3) 17 ऑक्‍टोबरपर्यंत "पय्यनूर ते तिरुअनंतपुरम' अशी जनरक्षा यात्रा काढणार असून, यात केंद्रातील अनेक मंत्रीही सहभागी होणार आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा उद्या तसेच पाच व 17 ऑक्‍टोबर या तिन्ही दिवशी केरळ मुक्कामी असतील, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की केरळमधील डाव्यांच्या हिंसाचारात भाजप व संघपरिवारातील 128 कार्यकर्ते बळी गेले आहेत. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या कन्नूर जिल्ह्यात हत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. माकपच्या या खुनी खेळाला भाजप लोकशाही पद्धतीने उत्तर देत असून, त्यासाठीच ही यात्रा काढण्यात येत आहे.

Web Title: new delhi news The bullet train will run in the scheduled time