चिदंबरम यांच्या घरावर "ईडी'चे छापासत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 जानेवारी 2018

दिल्ली, चेन्नईतील निवासस्थानाची कसून तपासणी; कॉंग्रेसची टीका

नवी दिल्ली: एअरसेल-मॅक्‍सिस प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली तसेच चेन्नईतील घरांवर छापे टाकले. मात्र आपण विरोधी पक्षात असल्यामुळे सरकारने ईडीचा गैरवापर चालविला आहे. मात्र काहीही झाले तरी सरकारविरुद्ध बोलणे किंवा लिहिणे आपण थांबबविणार नाही, असा इशारा पी. चिदंबरम यांनी दिला.

चिदंबरम यांनी या प्रकरणात निवेदनामार्फत खुलासा केला. ईडीने आज सकाळी आपल्या दिल्लीतील आणि चेन्नईतील निवासस्थानांची कसून तपासणी केली. त्यात त्यांना काही आढळले नाही. पंचनाम्यामध्येच सारे काही स्पष्ट आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करताना, कथित एअरसेल- मॅक्‍सिस प्रकरणात तपासाचे ईडीचे कार्यक्षेत्र नसल्याचे म्हटले होते. तसेच ईडीला उत्तर देण्यासाठी मुदत देताना सुनावणी 30 जानेवारीपर्यंत स्थगित केली होती. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याविरुद्ध किंवा आपल्या पुत्राविरुद्ध (कार्ती चिदंबरम) गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे ते ईडीच्या कार्यक्षेत्रात नाहीत. तरीही, आपण विरोधी पक्षात असल्यामुळे सरकारने आपल्याविरुद्ध ईडीचा गैरवापर चालविला आहे.

दरम्यान, कॉंग्रेसनेही चिदंबरम यांची पाठराखण करताना मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. पक्षाचे मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे ईडीचे शुक्‍लकाष्ठ लावत असल्याचा आरोप केला. राजकीय फायद्यासाठी आणि विरोधकांची मुस्कटाबी करण्यासाठी सीबीआय, ईडी सारख्या तपास यंत्रणांचा वापर चालविला असून, अशा प्रकारचे "छापा राज' म्हणजे मोदी सरकारचा डीएनए बनले आहे, असाही टोला सुरजेवाला यांनी लगावला.

Web Title: new delhi news chidambaram house raids on ed