कार्ती चिदंबरमप्रकरणी सीबीआयला विचारणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी खटला सुरू असताना माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनी चार-पाच दिवसांसाठी परदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला विचारणा केली असून, येत्या 16 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे सांगितले आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायधीश धनंजय वाय चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय पीठाने येत्या गुरुवारपर्यंत कार्ती चिदंबरम यांना अटींसह परदेशात जाण्याची परवानगी देता येईल का? याबाबत उत्तर देण्याचे सीबीआयचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सीबीआयकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी न्यायालयाने केली. ही कागदपत्रे सीबीआयला तपासणीदरम्यान मिळाली होती.

Web Title: new delhi news Chidambaram questions CBI for questioning