नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सरकारकडून पुन्हा फायद्याची आकडेमोड

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर 99 टक्के नोटा परत आल्यानंतर टीकेचे धनी ठरलेल्या सरकारने नोटाबंदीने झालेल्या लाभांचे दावे आज सादर केले. त्यामध्ये काळा पैसा शोधून काढण्याच्या मोहिमेला मिळालेली चालना, छाप्यांत मिळालेल्या रकमा, बेहिशेबी मिळकत कबूल करण्यात झालेली वाढ वगैरे लाभांचा समावेश टक्केवारी व आकडेवारीसह सादर करण्यात आला आहे.

सरकारकडून पुन्हा फायद्याची आकडेमोड

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर 99 टक्के नोटा परत आल्यानंतर टीकेचे धनी ठरलेल्या सरकारने नोटाबंदीने झालेल्या लाभांचे दावे आज सादर केले. त्यामध्ये काळा पैसा शोधून काढण्याच्या मोहिमेला मिळालेली चालना, छाप्यांत मिळालेल्या रकमा, बेहिशेबी मिळकत कबूल करण्यात झालेली वाढ वगैरे लाभांचा समावेश टक्केवारी व आकडेवारीसह सादर करण्यात आला आहे.

नोटाबंदीचे परिणाम
1) अंमलबजावणी विभागातर्फे उपलब्ध माहितीच्या आधारे छापे टाकण्यात 158 टक्‍क्‍यांनी (447 वरून 1152 समूहांवर छापे) वाढ झाली.
2) छाप्यात जप्त झालेल्या रकमेत 106 टक्के वाढ. ही रक्कम 712 कोटी रुपयांवरून 1469 कोटी रुपयांवर पोचली.
3) गुप्त ठेवलेल्या उत्पन्नाची कबुली देण्याच्या प्रमाणात 38 टक्‍क्‍यांनी वाढ (11226 कोटी रुपयांवरून 15 हजार 496 कोटी रुपये.)
4) उघडकीस आलेल्या बेहिशेबी संपत्तीत 44 टक्के वाढ (9654 कोटी रुपयांवरून 13920 कोटी रुपये)

स्वच्छ धनचा फायदा
नोटाबंदीनंतर सरकारने "स्वच्छ धन' योजना म्हणजे दंड, व्याज भरून बेहिशेबी धन अधिकृत करण्याची मोहीम आखली होती. पहिल्या टप्प्यात नोटबंदीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या 18 लाख खात्यांची दखल घेण्यात आली. त्या खातेधारकांना नोटिसा पाठवून विचारणा करण्यात आली. यासंदर्भात 13.33 लाख खातेधारक असलेल्या 9.72 लाख व्यक्तींनी सरकारच्या नोटिसांना उत्तरे सादर केली. दुसऱ्या टप्प्यात समाधानकारक उत्तरे नसलेल्यांची चौकशी व तपास आणि पुढील कारवाई सुरू केली जाईल. या मोहिमेत एक कोटी रुपये किमतीच्या 14 हजार मालमत्तांचे संशयास्पद व्यवहारही नजरेस आले आहेत व प्राप्तिकर खात्याकडून त्यांची चौकशी व तपास सुरू आहे.

"ई-रिटर्न' भरणारे वाढले
वैयक्तिक करदात्यांच्या संख्येत किंवा "ई-रिटर्न' भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, ती 2.22 कोटीवरून 2.179 कोटींवर पोचली आहे. म्हणजे या करदात्यांच्या संख्येत 57 लाखांनी वाढ झाली असेही या माहितीत नमूद करण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर प्रत्यक्ष करसंकलनालाही चालना मिळून त्यात वाढ नोंदली गेल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे.

Web Title: new delhi news Claims that the benefit of the nota bandi