अविवाहित महिलांचा कंडोम वापर वाढला सहा पटीने

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जानेवारी 2018

नवी दिल्लीः अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, 2015-16 मध्ये हे प्रमाण सहा पटीने वाढले आहे, अशी माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाने हे सर्वेक्षण केले असून, त्याचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला सादर केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापराचे प्रमाण वाढत चालले आहे. अविवाहित महिलांमध्ये 15 ते 49 वयोगटातील महिलांचा समावेश आहे.

अविवाहित महिलांपैकी 20 ते 24 वयोगटातील महिला सर्वाधिक कंडोमचा वापर करतात. आठ पैकी तीन पुरुष हे अविवाहित महिलांवर विश्वास ठेवत आहेत, असेही सर्वेक्षणातून उघड झाले आहे. दिवसेंदिवस सुरक्षित संभोग करण्याकडे महिलांचा कल वाढत असल्याचे दिसत आहे.

पंजाबमध्ये सर्वाधिक 76 टक्के अविवाहित महिला कंडोमचा वापर करतात तर मणिपूर, बिहार व मेघालयामध्ये हे प्रमाण 24 टक्के एवढे आहे. देशातील अनेक महिला अद्यापही पारंपारिक गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करताना दिसतात. लक्षद्विपमध्ये हे प्रमाण 30 टक्के तर चंदीगढमध्ये 74 टक्के एवढे प्रमाण आहे, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

Web Title: new delhi news condom use among unmarried women rises 6 fold in a decade