सत्तेत आल्यास "जीएसटी' मागे घेणार ः राहुल गांधी

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

नोटाबंदीचा सर्वाधिक फटका लघू व्यवसायांना बसला. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था तसेच रोजगारनिर्मितीवरही झाला. या निर्णयाशी मी पूर्णपणे असहमत असून, हा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य आर्थिक सल्लागार, आरबीआयचे गव्हर्नर व संबंधितांना अंधारात ठेवले.
- राहुल गांधी, अध्यक्ष काँग्रेस

मैसूर, ता. 24 (पीटीआय) ः आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास वस्तू सेवा कर (जीएसटी) मागे घेऊन एकसमान कर प्रणाली लागू करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले.

राहुल गांधी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले असून, त्यांनी येथील महाराणी विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "जीएसटी'अंतर्गत आकारल्या जाणाऱ्या 28 टक्के कराला आमचा विरोध असून, सत्तेत येताच त्यात बदल केला जाईल. अशा करपद्धतीमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असून, यामुळेच आम्ही "जीएसटी'चा उल्लेख "गब्बरसिंग टॅक्‍स' असा करतो, असे राहुल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नास उत्तर देताना नमूद केले.

'जीएसटी' ही मुळात आमची संकल्पना असून, त्याअंतर्गत एक करप्रणाली लागू करण्याचा आमचा मानस होता. मात्र केंद्र सरकारने त्यात विविध करांची भर घातली, असेही राहुल म्हणाले.

Web Title: new delhi news congress government gst rahul gandhi