भारतीय प्रशासकीय सेवेत सरदार पटेलांचे योगदान अमूल्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवानिर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. हे त्यांचे "मिशन' होते, आज मात्र काही जणांसाठी "कमिशन' बनले आहे, असे आज उपरराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी मत व्यक्त केले.

नेहरू स्मारक संग्राहालय आणि ग्रंथालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 142 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू बोलत होते. ते म्हणाले, की पटेल यांच्या अनेक योगदानाकडे आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर काहींना मान्यताही मिळाली नाही. देशाच्या ऐक्‍यात एकसूत्रता आणण्याचा त्यांच्या विचाराचा परिणाम हा भारतीय प्रशासकीय सेवाचा गाभा राहिलेला आहे. त्यानंतर पटेल यांनी या सेवेला भक्कम स्वरूप दिले. हेच योगदान पटेल यांच्या महान योगदानापैकी एक मानले जाते. पटेल यांनी सर्वोच्च पातळीवर निष्पक्षता राखण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त राहण्यावर भर दिला. ही बाब काल जेवढी लागू होती ती आजही लागू होते, असेही नायडू म्हणाले.

Web Title: new delhi news The contribution of Sardar Patel to the Indian Administrative Service was invaluable