दिल्लीत फटाकेविक्रीसाठी सवलतीस न्यायालयाचा नकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली: दिल्लीतील फटाका विक्रीवरील बंदीच्या निर्णयात 31 ऑक्‍टोबरपर्यंत कोणतीही सवलत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने नऊ ऑक्‍टोबरला दिल्ली व एनसीआर परिसरात फटाका विक्री करण्यास बंदी घातली होती. या निर्णयाला फटाका विक्रेत्यांनी आव्हान दिले होते. दिवाळीपूर्वी एक- दोन दिवस किंवा 19 ऑक्‍टोबरला तरी फटाका विक्री करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खडपीठाने त्यास नकार दिला. असे केल्यास आधिच्या निर्णयातील मूळ हेतूलाच बाधा येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खंडपीठ म्हणाले, ""तसेही दिवाळी फटाकेमुक्त होणार नाही. ज्यांनी नऊ ऑक्‍टोबरपूर्वी फटाके खरेदी केले आहेत ते लोक फटाके उडवू शकतात. लोकांनी आधीच फटाके खरेदी केले आहेत. लोक ते उडवतील आणि तेवढे पुरसे आहे. मात्र, केवळ विक्रेत्यांसाठी आम्ही बंदीच्या आदेशात सवलत देऊ शकत नाही. दिल्ली पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी.'' काही लोक न्यायालयाच्या आदेशाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल खंडपीठाने खेद व्यक्त केला.

Web Title: new delhi news Court denies discounts for cracker sales in Delhi