सोशल मीडियावरील माहितीची खात्री करा- राजनाथसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: सोशल मीडियावर चुकीची माहिती देऊन काही राष्ट्रविरोधी शक्ती समाजात तणाव निर्माण करण्याचे काम करीत आहेत, असे सांगून सोशल मीडियावर आलेल्या संदेशांबद्दल सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय ते "फॉरवर्ड' करू नयेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी केले.

सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) गुप्तचर विभागाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजनाथसिंह म्हणाले, ""व्हॉट्‌सऍप व अन्य सोशल मीडियावर चुकीची व कशाचाही आधार नसलेली माहिती व बातम्या सातत्याने फिरविल्या जात असतात. त्यावरील माहिती खरी असल्याचा अनेकांचा समज होतो. "एसएसबी' जवानांनी अशा संदेशांवर विश्‍वास ठेवू नये व ते "फॉरवर्ड'ही करू नये. यापूर्वी आपण सर्वांनीच संदेशातील माहितीची खातरजमा करून घ्यायला हवी.''

दरम्यान, "एसएसबी'मध्ये प्रथमच गुप्तचर विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या शेजारी असलेल्या भूतान व नेपाळ सीमेवरील माहिती या विभागातर्फे गोळा केली जाणार आहे. पाकिस्तानमधून येणारे दहशतवादी व अन्य गुन्हेगार भारतात प्रवेश करण्यासाठी या सीमांचा वापर करीत असल्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष देणे आवश्‍यक ठरत आहे. या विभागात 650 जण कार्यरत असणार आहे.

Web Title: new delhi news Ensure information on social media - Rajnath Singh