बनावट नोटा हा दहशतवादाचा प्राणवायू ः राजनाथसिंह

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली: "बनावट चलनी नोटा हा दहशतवादाचा प्राणवायू असून, शेजारी देशांतून काश्‍मीरमधील अराजकतेसाठी होणारी आर्थिक रसद तोडण्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोलाची कामगिरी बजावली आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज व्यक्त केले.

"एनआयए'च्या नव्या मुख्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजनाथसिंह म्हणाले, ""कोणताही नागरी देश आपल्या भूमीवर दहशतवाद पोसणे मान्य करणार नाही. बनावट नोटा या दहशतवादासाठी ऑक्‍सीजन म्हणून काम करतात. दहशतवाद हा विकासातील मोठा अडथळा असून, आमचे सरकार त्याविरुद्ध कडक कारवाई करत आहे.''

पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले, ""काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी शेजारील देशातून होणारी आर्थिक मदत "एनआयए'ने बंद पाडली. त्यामुळे दहशतवाद्यांचे अवसान मोडून पडले. दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या अर्थपुरवठ्याची चौकशी "एनआयए'ने या वर्षी जूनमध्ये सुरू केली व अनेक ठिकाणी छापे टाकले. दहा फुटीरतावाद्यांना अटक केली.''

ते म्हणाले, ""जागतिक पातळीवर दहशतवादाच्या धोक्‍याचे परिणाम समजावून सांगण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली. पंतप्रधान मोदी यांनी या प्रश्‍नावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. देशात दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी "एनआयए'ने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अशा हल्ल्यानंतर पुरावे गोळा करणे हे आव्हान असते. दहशतवादी हल्ल्यांतील 95 टक्के प्रकरणांत आरोपींना शिक्षा मिळाली आहे. गेल्या आठ वर्षांत "एनआयए'ने विश्‍वासार्हता कमावली आहे.''

"एनआयए'चे महासंचालक शरद कुमार म्हणाले, ""स्थापनेपासून आतापर्यंत "एनआयए'कडे तपासासाठी 166 प्रकरणे आली. त्यातील 66 जिहादी दहशतवादाची, 25 ईशान्येकडील दहशतवादी कृत्याची, तर 41 प्रकरणे दहशतवादाला अर्थपुरवठा व बनावट चलनाची होती. अन्य प्रकरणे देशाच्या विविध भागांतील घातपाती कृत्यांची होती.''

Web Title: new delhi news Fake Note The Oxidation of Terrorism: Rajnath Singh