गुजरात निवडणुकीमुळे 'जीएसटी'वर सरकार नरमले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली: केवळ गुजरात निवडणुकीमुळे मोदी सरकार "जीएसटी'वर नमले असून अंमलबजावणीसाठी आता विरोधक आणि तज्ज्ञांचा सल्ला ऐकत आहे, असा टोला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला लगावला.

नवी दिल्ली: केवळ गुजरात निवडणुकीमुळे मोदी सरकार "जीएसटी'वर नमले असून अंमलबजावणीसाठी आता विरोधक आणि तज्ज्ञांचा सल्ला ऐकत आहे, असा टोला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला लगावला.

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. तर, जीएसटी परिषदेमध्येही कर फेररचनेचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरण्याचे कॉंग्रेसने जाहीर केले आहे. दुसरीकडे सरकारकडूनही जीएसटीच्या कररचनेच्या फेर आढाव्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्‌विटर अस्त्राचा वापर करून सरकारवर हल्ला चढवला.

सरकारवर आडमुठेपणाचा आरोप करताना चिदंबरम यांनी म्हटले आहे, की गुजरात निवडणुकीमुळेच सरकारने नमते घेत जीएसटीमधील त्रुटींबद्दल विरोधी पक्षांचे, तज्ज्ञांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दर्शविली आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये बदलाच्या घोषणांचा वर्षाव अपेक्षित असून घाबरलेल्या सरकारपुढे याखेरीज दुसरा पर्याय नाही. राज्यसभेत जीएसटीवर चर्चेपासून पळ काढणाऱ्या सरकारला आता सार्वजनिक चर्चेपासून किंवा जीएसटी परिषदेत तरी चर्चेपासून पळ काढता येणार नाही. या चर्चेमध्ये कॉंग्रेस शासीत राज्यांचे अर्थमंत्री सरकारला उघडे पाडतील, असाही इशारा चिदंबरम यांनी दिला.

Web Title: new delhi news GST gets slowdown due to Gujarat elections